नवोदय विद्यालयात अकरावीसाठी प्रवेश

नवोदय विद्यालयात अकरावीसाठी प्रवेश

नवोदय विद्यालयात अकरावीसाठी प्रवेश
सावंतवाडी ः शिक्षा मंत्रालय, भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी अकरावीसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोयडा द्वारा प्राप्त झाले आहेत. प्रवेशाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मे असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत व याचा फायदा घ्यावा, असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले. प्रवेश निवड परीक्षा २२ जुलैला होणार आहे.
-------------------
आंबेरीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मालवण ः समीर मांजरेकर मित्रमंडळ आंबेरी पंचक्रोशीतर्फे ‘एक गाव एक संघ’ या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ३ व ४ जूनला केले आहे. प्रथम ७००० रुपये, व्दितीय ५००० रुपये तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर यांना चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा सकलेश्वर मंदिरनजीक मैदान येथे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com