टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू

टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू

टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरीः शहरातील मुरूगवाडा येथे टेम्पोखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. पार्क केलेल्या टेम्पोच्यामागे सावलीखाली तरुण झोपला होता. चालकाने गाडी सुरू केल्याने तरुण टेम्पोखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २६) दुपारच्या सुमारास घडली. राजासाब नबीसाब पटेल (वय ४१, रा. मुरूगवाडा ) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
...................
rat27p12.jpg, rat27p13.jpg
05394, 05395
दासगावः येथे अपघातामध्ये वाहनांचे झालेले नुकसान.

दासगास येथील अपघातात दोन गंभीर
खेडः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगास गावाच्या हद्दीत निसर्ग हॉटेलसमोर शनिवारी (ता. २७) सकाळी सातच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खेडमधील दोनजण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गावहद्दीत खेड ते मुंबई जाणारी दुचाकी आणि मुंबई ते गुहागर जाणारी चारचाकी या दोन वाहनांमध्ये जोराची धडक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com