रत्नागिरी ः रत्नागिरीत आज ''गौरव चरित्रकाराचा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरीत आज ''गौरव चरित्रकाराचा''
रत्नागिरी ः रत्नागिरीत आज ''गौरव चरित्रकाराचा''

रत्नागिरी ः रत्नागिरीत आज ''गौरव चरित्रकाराचा''

sakal_logo
By

रत्नागिरीत आज
‘गौरव चरित्रकाराचा’
डॉ. धनंजय कीर यांच्या २ चरित्रग्रंथांचे प्रकाशन
रत्नागिरी, ता. २७ः रत्नागिरीतला मोठा इतिहास असून, रत्नांची खाण म्हणून रत्नागिरीची ख्याती आहे. याच रत्नागिरीच्या इतिहासात भर पडण्यासाठी उदय सामंत फाउंडेशनची स्थापन करत गौरव चरित्रकाराचा या कार्यक्रमात रत्नागिरीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चरित्रकार पद्मविभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या दोन चरित्रग्रंथांचे प्रकाशन उद्या (ता. २८) दुपारी १२ वा. स्वयंवर मंगल कार्यालयात सावरकर जयंतीच्या निमित्ताने होणार आहे.
या ग्रंथाचे लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर आहेत. प्रकाशन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. श्रीरंग कद्रेकर, विजय कुवळेकर, किरण सामंत, बाळासाहेब परूळेकर, विलास पाटणे, प्रकाश देशपांडे, सुनीता कीर, दिलीप भाटकर, डॉ. सायली नार्वेकर, राजू भाटकर, दत्तात्रय वालावलकर, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमख राहुल पंडित यांनी केले आहे.