चिपळुणातील अपघातात पुण्यातील तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातील अपघातात पुण्यातील तरुणाचा मृत्यू
चिपळुणातील अपघातात पुण्यातील तरुणाचा मृत्यू

चिपळुणातील अपघातात पुण्यातील तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

चिपळुणातील अपघातात
पुण्यातील तरुणाचा मृत्यू
चिपळूण, ता. २७ः चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे शुक्रवारी रात्री मोटार व आराम बसचा अपघात झाला. यात मोटारीमधील एकजण ठार झाला असून, अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. राजेंद्र चिटू राऊत (४५, आकुर्डी, पुणे) असे मृताचे नाव आहे. राजेंद्र भवरलाल सोदा (हवेली, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक दादासाहेब त्रिंबक अडसूळ (चिंचवड, पुणे), प्रीतम ज्ञानेश्वर तावडे (पुणे) अशी अन्य जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटार पुण्याहून चिपळूण येथील कापसाळ येथे जात होती. या वेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आरामबसची धडक मोटारीला बसली. ही घटना चिपळूण-कराड मार्गावर पिंपळी येथे हॉटेल निसर्गसमोर घडली. या घटनेची माहिती अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याला मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला.