
राजापूर तालुक्यातील 24 खेळाडुना ब्लॅक बेल्ट
rat२६p१०.jpg ः
०५११३
राजापूरः यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत तायक्वांदो अॅकॅडमी, राजापूरचे अध्यक्ष अभिजित तेली, संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक मुकेश नाचरे.
राजापूर तालुक्यातील २४ खेळाडुंना ब्लॅक बेल्ट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकूल येथे मार्शल आर्ट क्षेत्रात मानाचा समजला जाणारी ब्लॅक बेल्ट परीक्षा नुकतीच पार पडली. त्यामध्ये तालुक्यातील २४ खेळाडूंनी यश संपादित करत राजापूर तालुक्याची मान उंचावली.
राज्यातील सुमारे तीनशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा आरंभ जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्या हस्ते झाला. या वेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व राज्यसंघटना व्यंकटेशवर कररा, राज्य संघटनेचे सदस्य सतीश खेमस्कर, आंतरराष्ट्रीय पंच लक्ष्मण कररा आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातील तायक्वांदो अॅकॅडमी, राजापूरच्या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक मुकेश नाचरे आणि महिला प्रशिक्षक मधुरा नाचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले. यामध्ये हर्षराज जड्यार, युवराज मोरे, अंश गुंड्ये, हितेंद्र सकपाळ, गौरव धालवलकर, आकाश बरई, विराज बारड, आदित्य तेली, विघ्नेश वाडेकर, अमृता मांडवे, श्रुतिका मांडवकर, पूर्वा राऊत, ध्रुवी केळकर, रिचा मांडवकर, श्रुती चव्हाण, आस्था पिठलेकर, सलोनी भोगटे, विशालाक्षी दिवटे, रिया मयेकर, वैष्णवी पाटील, मिताली घुमे, प्रांजली चव्हाण, पृथा पेणकर, गार्गी बाकाळकर या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी या परीक्षेमध्ये पुमसे क्युरोगी, ब्रेकिंग, सेल्फ डिफेन्स फिटनेस टेस्ट पार पाडल्या. प्रशिक्षक नाचरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक खेळाडूंनी या खेळामध्ये सुयश संपादन केले आहे. ती यशाची पंरपरा त्यांनी या वेळीही कायम ठेवली आहे.