भाजप जिल्हा चिटणीसपदी
विनायक राणेंची नियुक्ती

भाजप जिल्हा चिटणीसपदी विनायक राणेंची नियुक्ती

भाजप जिल्हा चिटणीसपदी
विनायक राणेंची नियुक्ती
कुडाळ ः भाजपचे कुडाळ मंडल अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांना जिल्हा चिटणीसपदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांना नियुक्ती देण्यात आली. या संदर्भातील नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथील पक्ष कार्यालयात दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, मंडल अध्यक्ष विनायक राणे, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, माजी सभापती ॲड. बंड्या मांडकुलकर, अभय परब, किशोर मर्गज, आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजपा नगरपंचायत गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक नीलेश परब, राजीव कुडाळकर, समाधान परब, भाऊ पोतकर आदी उपस्थित होते.
..............
खासदार राऊत यांची आज
रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा
कुडाळ ः गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या बुकिंग संदर्भात आलेल्या तक्रारींबाबत खासदार विनायक राऊत हे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांची उद्या (ता. २९) भेट घेणार आहेत. या अनुषंगाने खासदार राऊत यांनी नुकतीच कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली होती. कोकण रेल्वे मार्गावर कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी अधिकाधिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते उद्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक लालवाणी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी सुमारे १६०० पेक्षा अधिक कोकणवासीयांनी ई-मेलवर आपल्या सूचना मांडल्या आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी सखोल चर्चा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com