चिपळुणात आज शब्दसुगंधचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात आज शब्दसुगंधचे प्रकाशन
चिपळुणात आज शब्दसुगंधचे प्रकाशन

चिपळुणात आज शब्दसुगंधचे प्रकाशन

sakal_logo
By

चिपळुणात आज
शब्दसुगंधचे प्रकाशन
चिपळूण : येथील तुकाराम गणपत जाधव यांच्या लेखणीतून साकारलेल्या ''शब्दसुगंध'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी (ता. २९)
होणार आहे. शहरातील माधव सभागृहात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल. देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व साहित्यिक डॉ . सुरेश जोशी यांच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशन सोहळा होईल. या वेळी आमदार शेखर निकम, ज्येष्ठ साहित्यिक अरुण इंगवले, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के आदी उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शेखर जाधव यांनी केले आहे.
---------
शहरातील खड्ड्यात
बसून करणार उपोषण
दाभोळः दापोली शहरातील सुमारे दोन ते तीन वर्षे मेहता पेट्रोल पंपासमोरील रस्ता खड्डेमय आलेला असून तो दुरुस्त न केल्यास याच खड्ड्यात बसून ३० मे रोजी उपोषण करण्याचा इशारा अभिजित चितळे यांनी दिला आहे. दापोली-हर्णै मुख्य मार्गावर मेहता पेट्रोल पंप व तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही नगरपंचायात प्रशासनाकडून ते बुजविले जात नाहीत. ३० मेपर्यंत हे खड्डे न बुजविल्यास याचा खड्ड्यात बसून आपण उपोषण करणार असल्याचा इशारा अभिजित चितळे यांनी दिला आहे.
-----------------------------
कृषी मार्गदर्शन
मेळावा उद्या
राजापूरः राजापूर कृषी विभाग, राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी आणि स्नेहरत्न कृषी संघ यांच्यावतीने मंगळवारी (ता. ३०) कृषी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. किसानभवन सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या मेळाव्यामध्ये रेशीम उद्योग आणि बांबू लागवड तंज्ञत्रान याविषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. नाशिक येथील नानासाहेब जाधव मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी विवेक गुंड यांनी केले आहे.
--------
प्रशिक्षण, जागृती
कार्यक्रम आज
दाभोळ ः राष्ट्रीय बागवानी बोर्ड पुणे व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या वतीने राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या योजना, प्रशिक्षण व जागृती कार्यक्रम सोमवारी (ता. २९) दापोली येथे होणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामिनाथन सभागृहात सकाळी १० ते ५.३० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून त्यात योजना, अर्थसहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार असून शेतकरी व बागायतदार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.