Fri, Sept 22, 2023

जिल्हा मजूर संघाचे संचालक
आत्माराम बालम भाजपमध्ये
जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजपमध्ये
Published on : 28 May 2023, 10:54 am
05528
कणकवली : येथील ओम गणेश निवासस्थानी आत्माराम बालम यांनी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हा मजूर संघाचे संचालक
आत्माराम बालम भाजपमध्ये
कणकवली, ता.२८ : शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. आमदार नीतेश राणे यांनी श्री.बालम यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
श्री.बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात ठाकरे गटाला आमदार नीतेश राणे यांनी जोराचा झटका दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पक्षप्रवेशावेळी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशी राणे, देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, मिलिंद माने आदी उपस्थित होते.