सुकळवाड परिसरात बिबट्याचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकळवाड परिसरात
बिबट्याचा वावर
सुकळवाड परिसरात बिबट्याचा वावर

सुकळवाड परिसरात बिबट्याचा वावर

sakal_logo
By

सुकळवाड परिसरात
बिबट्याचा वावर
मालवण : तळगाव मार्गावरून शनिवारी (ता. २७) रात्री दुचाकीने प्रवास करणाऱ्या सुकळवाड हुलेवाडी येथील प्राणिल हुले यांना बिबट्याचे दर्शन झाले. कुत्रे जोरात भुंकत असल्याने त्या दिशेने पाहिले असता लांबून त्यांना बिबट्या जाताना दिसून आला. याबाबतची माहिती सुकळवाड येथील चेतन मुसळे यांनी दिली. गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.............
मालवणात ६ जूनला
व्याख्यानाचे आयोजन
मालवण : शिवराज्याभिषेक दिन म्हणून ६ जून हा दिवस साजरा केला जातो. या शिवघटनेला यावर्षी ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या नवीन इमारतीत ६ जूनला सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत महेश धामापूरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी वाचक महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या बाल सभासदांना बक्षीस वितरण व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी वाचन मंदिरने केले आहे.
..............
वेंगुर्ले ज्येष्ठ नागरिक
संघाची ४ जूनला सभा
वेंगुर्ले ः ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ले या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ४ जूनला रोजी सकाळी १० वाजता येथील साई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पुढील तीन वर्षांसाठी पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांची निवड तसेच विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रा. पां. जोशी, कार्यवाह जगदीश तिरपुडे यांनी केले आहे.
................
राष्ट्रवादी काँग्रेसची
आज वेंगुर्लेत सभा
वेंगुर्ले ः येथील राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकास्तरीय ग्रामीण व शहर कार्यकारिणीची सभा उद्या (ता. २९) सायंकाळी ४.३० वाजता हॉस्पिटल नाका येथील पक्ष कार्यालयात होणार आहे. या बैठकीत बुथ निहाय आढावा, विविध सेलच्या तालुका कार्यकारिणी निवड व १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष योगेश कुबल व शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.