पहिल्या कौशल्य विकास केंद्र आठ महिन्यात सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या कौशल्य विकास केंद्र आठ महिन्यात सुरू
पहिल्या कौशल्य विकास केंद्र आठ महिन्यात सुरू

पहिल्या कौशल्य विकास केंद्र आठ महिन्यात सुरू

sakal_logo
By

कौशल्य विकास
केंद्राचे लोकार्पण
रत्नागिरी, ता. २८ः महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विकास केंद्राचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या केंद्राचे बांधकाम आठ महिन्यात विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले.
राज्य तंत्रशिक्षण मंडळाने स्किल ट्री कन्सल्टन्सी या कंपनीमार्फत कौशल्य विकास केंद्राची निर्मिती केली असून हॉस्पिटॅलिटी, पर्यटन आणि कृषी क्षेत्रात खालील प्रकारचे विविध कोर्स सुरू करण्यात आले आहेत. फूड अँड बेव्हरेजेस सेवा-स्टीवर्ड, फ्रंट ऑफिस असोसिएट, गेस्ट सर्व्हिस असोसिएट (हाऊसकिपिंग), फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, हाऊसकीपिंग सुपरवायझर, किचन स्टीवर्ड शेफ, असिस्टंट शेफ (ट्रेनी शेफ), किचन हेल्पर, टूर मार्गदर्शक, टूर व्यवस्थापक, कीटकनाशक आणि खत ऍप्लिकेटर, माती आणि पाणी चाचणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे अभ्यासक्रम मर्यादित कालावधीत पूर्ण करून तरुणांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून शिकवला जाणार असून अत्याधुनिक प्रयोगशाळेतून प्रात्यक्षिक, औद्योगिक कंपन्यांना भेटी तसेच नोकरी दरम्यान प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळोवेळी या क्षेत्रातील दिगग्ज लोकांकडून अतिथी व्याख्याने अयोजित केली जातात. हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून देण्यात येणार असून अत्याधुनिक प्रयोगशाळेतून प्रॅक्टिकल्स, इंडस्ट्रियल भेटी तसेच नोकरी दरम्यान प्रशिक्षणाची संधी निर्माण केली आहे. या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडून वेळोवेळी अतिथी व्याख्याने आयोजित केली जातात.