उपवडे येथील शेतकऱ्यांना
गांडूळ खताबाबत मार्गदर्शन

उपवडे येथील शेतकऱ्यांना गांडूळ खताबाबत मार्गदर्शन

05579
उपवडे ः बेड वाटप प्रसंगी सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, भगीरथ प्रतिष्ठानचे नवीन मालवणकर, मनोहर ठिकार व लाभार्थी महिला.

उपवडे येथील शेतकऱ्यांना
गांडूळ खताबाबत मार्गदर्शन
माणगाव ः वसोली ग्रुप ग्रामपंचायत व भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान, झाराप यांच्या संयुक्त विद्यमाने उपवडे येथे शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्यासाठी बेड वाटप करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष गांडूळ खत निर्मिती प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी वसोली सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, सदस्य निवास कारुडकर, संतोष राऊळ, महादेव राऊळ, विठ्ठल सावंत, बाळकृष्ण दळवी, समीर शेडगे, तानाजी दळवी, वनिता सावंत, भगीरथचे नवीन मालवणकर, प्रमुख मार्गदर्शक मनोहर ठिकार आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया राऊळ, वैशाली राणे, उर्मिला राऊळ, वनिता सावंत, बबिता दळवी, अनिता राऊळ, वैशाली राऊळ, विलासणी राणे, दिव्या नाईक, विजय सावंत, काशिनाथ कविटकर, संदीप सावंत, गौरेश राऊळ, निवास कारुडकर आदी १७ शेतकऱ्यांना बेड वाटप करण्यात आले. ठिकार, मालवणकर यांनी मार्गदर्शन केले.
..............
मालवणात ६ जूनला शिवकथा स्पर्धा
मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जूनला दुपारी साडेतीनला येथील ग्रंथालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय खुली शिवकथा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत १५ वर्षे व त्यावरील स्पर्धकांना सहभाग घेता येईल. ही स्पर्धा छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावरील प्रसंगांवर आधारीत आहे. स्पर्धेसाठी वेळ मर्यादा ७ ते १० मिनिटे असून तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एसटी तिकीटाचा प्रवासखर्च देण्यात येईल. विजेत्यांना अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ रुपये व प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी श्रेया चव्हाण येथे ४ जूनपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उदयराव मोरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com