गुहागर-धोपावेतील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंतांना पाठिंबा

गुहागर-धोपावेतील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंतांना पाठिंबा

धोपावेतील ग्रामस्थांचा सामंतांना पाठिंबा
गुहागर, ता. २८ः गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत खऱ्या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवून दिल्यानंतर जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. धोपावे ग्रामस्थांनी तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत पाण्याची कैफियत मांडली व रस्त्याच्या कामावरील बंदी उठविण्याची मागणी करत एकमताने पालकमंत्री सामंत व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा ठराव करत आश्वासन दिले. धोपावे गावातील विविध कामांची मागणी करत पाठिंबा दर्शविला. यात प्रामुख्याने पश्चिमेच्या किनारपट्टीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधणे व रस्ता तयार करणे आदी विकास कामांची मागणी केली. धोपावे गाव विकासापासून अनेकवर्षे मागे गेला. यामध्ये बदल व्हावा आणि तो शिवसेना पक्ष व पालकमंत्री सामंतच करू शकतात असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख कनगुटकर, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे, उपतालुकाप्रमुख राजेश धामणस्कर, उपविभागप्रमुख नरेश पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com