रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

पान 3 साठी)

रेल्वे स्थानकात रोकडसह दागिने पळविले
रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे ट्रेनमध्ये चढत असताना सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 मे रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथून मुंबईला जाण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे पती मनोहर हे रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आले होते. यावेळी जबलपूर एक्स्प्रेसने मुंबईसाठी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढत असताना अज्ञाताने फिर्यादी यांच्या मालकीचे 2 लाख 39 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, एकावर गुन्हा
रत्नागिरी ः सार्वजनिक ठिकाणी दारू प्राशन करणारा संशयित जिशान सर्फराज शेख याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 मे रोजी जिशान सर्फराज शेख (वय 20, सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) हा उद्यमनगर येथे महिला शासकीय रुग्णालय अर्थात वुमन्स हॉस्पिटलजवळ मद्य प्राशन करताना आढळून आला. याप्रकरणी जिशान सर्फराज शेख याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 अन्वये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातभट्टीची दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी ः गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याबद्दल आरोपी यशवंत वसंत सागवेकर याच्या विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 मे रोजी साठरेबांबर तेलीवाडीत जाणाऱ्या पायवाटेच्या बाजूस काजूच्या झाडाखाली मोकळ्या जागेत संशयित यशवंत वसंत सागवेकर (वय 35) याच्याकडे गावठी हातभट्टीची दारू गैरकायदा विक्रीच्या उद्देशाने आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी 430 रुपयांची 8 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विषारी औषध प्यायल्याने विवाहितेचा मृत्यू
रत्नागिरी ः विषारी औषध प्राशन करणाऱ्या नवविवाहितेचा रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 25 मे रोजी नवविवाहिता मृत महिला सरिता सुमित झोरे (वय 24, मूळ रा. आंबवली, संगमेश्वर, सध्या रा. शांतीनगर, नाचणे) हिने विषारी औषधाचे प्राशन केल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 26 मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. याची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com