इंजिनियरच्या आत्मदहन इशाराने मार्गताम्हानेत खळबळ

इंजिनियरच्या आत्मदहन इशाराने मार्गताम्हानेत खळबळ

इंजिनियरच्या आत्मदहन इशाराने मार्गताम्हानेत खळबळ
ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ; आदेशानंतरही कारवाईकडे दुर्लक्ष
चिपळूण, ता. २८ : नियमबाह्य बांधकामाविरोधात मार्गताम्हाने खुर्द ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ येथील ग्रामस्थ व अभियंता जितेंद्र कृष्णा चव्हाण हे मंगळवारी (ता. ३०) ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
जितेंद्र चव्हाण यांनी मार्गताम्हाने खुर्द उगवतवाडी येथील मानसिंग चव्हाण करत असलेल्या नियमबाह्य बांधकामाबाबत निवेदन दिले आहे. हे काम नियमबाह्य असल्याचे ग्रामपंचायतीने मान्य केले आहे. तसेच गटविकास अधिकारी यांनी १९ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या सुचनांचे अजुनपर्यंत पालन केलेले नाही. या जागेची पाहणी करण्याची वारंवार विनंती केली होती, परंतु जाणुनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गटविकास अधिकारी यांनी १७ एप्रिल २०२३ च्या पत्राने स्पष्ट आदेश दिलेले असूनही नियमबाह्य बांधकामावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आपल्यावर प्रत्येक वेळी अन्याय होत असून कामधंदा सोडून मुंबई येथून न्यायासाठी वारंवार यावे लागत आहे. त्यामुळे मार्गताम्हाने खुर्द ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करणार असून याला सरपंच, सर्व सदस्य व मानसिंग चव्हाण हे जबाबदार असतील असे जितेंद्र चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत ग्रामपंचायतची बाजू समजून घेण्यासाठी सरपंच प्रभाकर चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीची बाजू समजू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com