चिपळूण ः उक्ताड बेटावरील गाळ उपशाचे काम पूर्णत्वाकडे

चिपळूण ः उक्ताड बेटावरील गाळ उपशाचे काम पूर्णत्वाकडे

फोटो ओळी
- ratchl२९३.jpg ःKOP23M05687 चिपळूण ः उक्ताड बेट परिसरात सुरू असलेले गाळ उपशाचे काम.
-----------------

वाशिष्ठीतील गाळ उपसा--लोगो

उक्ताड बेटावरील गाळ उपशाचे काम पूर्णत्वाकडे

मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी ; गोवळकोटमधील काम सुरू करण्यासाठी प्रयत्न

चिपळूण, ता. २९ ः पूरमुक्त चिपळूणचे ध्येय घेऊन नाम फाउंडेशन वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासाठी दिवसरात्र झटत आहे. पावसाळा जवळ आल्याने उक्ताड व पेठमाप येथील कामाकडे विशेष लक्ष केंद्रित करत येथे मोठी यंत्रणा तैनात ठेवली आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून उक्ताड बेट परिसरातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पेठमाप बेट येथील काम अवघे २० टक्केच शिल्लक राहिले आहे. या दोन्ही कामांची पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी अधिकाऱ्यांसह रविवारी पाहणी करत आढावा घेतला.
चिपळूण बचाव समिती, प्रशासन, जलसंपदा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या नाम फाउंडेशनकडून उक्ताड व पेठमाप बेट येथे गाळ उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी ५ पोकलेन व २१ डंपर कार्यरत आहेत, तर काही स्थानिकांच्या विरोधामुळे गोवळकोट धक्का येथील गाळ उपशाचे काम नामने थांबवले आहे. या परिसरातील यंत्रणा काम सुरू असलेल्या ठिकाणी हलवण्यात आली आहे. सध्या उक्ताड येथील गाळ काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बेटाचा एक तुकडा आणि बनवलेला रस्ता हे काढणे शिल्लक आहे. पेठमाप येथील बेटावरच्या काढलेल्या गाळापैकी ८० टक्के गाळ इतर ठिकाणी हलवण्यात आला आहे. २० टक्के काम शिल्लक आहे. गोळळकोट येथील काम सध्या बंद असून, येथील नागरिक हे काम पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, रविवारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पालिकेतील अभियंता व सामाजिक कार्यकर्ते गुलमोहम्मद शाह यांनी उक्ताड व पेठमाप येथील गाळ उपसा कामांची पाहणी केली तसेच कामाचाही आढावा घेतला. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या गाळ उपसा कामासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले.

चौकट-
आमदार निकम यांचे जोरदार प्रयत्न
काही स्थानिकांनी गाळ वाहतूक करणारे डंपर रोखल्याने आणि कामात सातत्याने अडचणी निर्माण केल्या जात असल्याने नाम फाउंडेशनने गोवळकोट धक्का येथील गाळ उपशाचे काम थांबवले आहे. गेले सहा दिवस हे काम बंदच आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यानंतर गाळ काढण्याचे काम थांबणार आहे. त्यामुळे येथील काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आमदार निकम यांनी या संदर्भात नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर यांच्याशी संपर्क साधत चर्चा केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com