असलदे आश्रमातील वृद्धांची मोफत आरोग्य चिकित्सा

असलदे आश्रमातील वृद्धांची मोफत आरोग्य चिकित्सा

swt२९१५.jpg
०५७१४
असलदेः वृद्धाश्रमात आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करताना डॉ. तपसे.

असलदे आश्रमातील वृद्धांची
मोफत आरोग्य चिकित्सा
नांदगाव, ता. २९ः नियमित सामाजिक उपक्रमांत सहभागी होणारे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तपसे यांच्यावतीने रविवारी (ता. २८) असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले. असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करून मोफत गोळ्या, औषधे देण्यात आले. वृद्धाश्रमात ४६ आजी-आजोबा आहेत. त्यापैकी ३८ जणांची रक्तदाब, मधुमेह, नेत्र, त्वचा व सर्वसाधारण चिकित्सा डॉ. तपसे यांनी केली. गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सेवा बजावून सुद्धा वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी करून डॉ. तपसे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. वृद्धाश्रमातील आश्रितांसह कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
..................
मसुरेत गाळ उपसा पूर्ववत
मालवण, ता. २९ : जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम इंधनासाठी असलेला निधी संपल्याने बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे काम समाधानकारक नसून पुन्हा गाळ उपसा सुरू करण्याची मागणी मसुरे गावातील स्थानिकांनी भाजपा नेते, माजी खासदार नीलेश राणेंकडे केली होती. त्यावर राणे यांनी मसुरे येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत जलसंधारण विभागाशी पत्रव्यवहार करत राणे यांनी तातडीच्या निधी उपलब्धतेची मागणी केली. त्यानुसार चार दिवसांत आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे रमाई नदीतील गाळ उपसा पुन्हा सुरू झाला असून मसुरे ग्रामस्थांनी राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com