
‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कारांचे किनळेत वितरण
05730
किनळे ः येथे ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कारांचे किनळेत वितरण
‘जय भीम’चा पुढाकार; संयुक्त बुद्ध-भीम जयंतीनिमित्त उपक्रम
देवगड, ता.२९ः किनळे (ता. सावंतवाडी) येथील जय भीम उत्कर्ष मंडळ व जाधव परिवारातर्फे ल. रा. जाधव स्मृती प्रित्यर्थ दिला जाणाऱ्या ‘महाधम्मरक्खिता’ पुरस्कारांचे वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत किनळे येथे झाले. यावेळी प्रा. बी. पी. कांबळी, आर. जी. चौकेकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिवंगत वि. रा. आसोलकर यांना जाहीर झालेला मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला.
या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी केले जाते. धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच विविध उपक्रम राबविणाऱ्या बौद्धवाडी-वस्तीला, गावांना हा पुरस्कार दिला जातो. किनळे येथे संयुक्त बुद्ध-भीम जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव केला. गौतम बुद्धांच्या २५८५ व्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज आणि त्याचा प्रसार याचे महत्व विशद केले. बाबासाहेबांनी केलेले धम्म प्रवर्तन, त्यातून झालेले सामाजिक बदल, बुद्धांच्या महान विचारांची अखंड जगाला असलेली आवश्यकता यावर मंथन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी अध्यक्ष बी. पी. कांबळी, सचिव आर. जी. चौकेकर, कोषाध्यक्ष मिलिंद नेमळेकर, संस्कार विभाग उपाध्यक्ष मोहन जाधव, सचिव रमाकांत जाधव, ए. पी. कदम, संघटक दिलीप जाधव, चंद्रशेखर जाधव, व्ही. आर. आसोलकर, अशोक जाधव, विजय जाधव, किशोर जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक फोंडा शाखेचे सहायक व्यवस्थापक जयंत जाधव, अध्यक्षस्थानी शंकर जाधव होते. सचिन जाधव यांनी आभार मानले.