ठाकरे शिवसेनेतर्फे दाखल्यांची सुविधा

ठाकरे शिवसेनेतर्फे दाखल्यांची सुविधा

ठाकरे शिवसेनेतर्फे
दाखल्यांची सुविधा
मालवण, ता. २९ : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले तत्काळ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ठाकरे शिवसेनेच्यावतीने शाखा कार्यालयात सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती युवती सेना तालुकाध्यक्ष निनाक्षी शिंदे, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी दिली. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. येत्या काही दिवसांत दहावी परीक्षेचा निकालही जाहीर होणार आहे. निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. हे दाखले गोळा करेपर्यंत पालकांची धावपळ उडते. यात बऱ्याचदा पैसे व वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत, यासाठी शाखा कार्यालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिंदे, ओरसकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com