पत्रकार नीलेश मोरजकरांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकार नीलेश मोरजकरांचा
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
पत्रकार नीलेश मोरजकरांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

पत्रकार नीलेश मोरजकरांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

sakal_logo
By

05734
गोवा ः साखळी येथील कार्यक्रमात पत्रकार नीलेश मोरजकर यांना पुरस्कार देऊन गौरविताना पद्मश्री विनायक खेडेकर व माजी केंद्रीयमंत्री अॅड. रमाकांत खलप. शेजारी अजितसिंह राणे, राजतिलक नाईक आदी.

पत्रकार नीलेश मोरजकरांचा
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
बांदा, ता. २९ ः साखळी-गोवा येथील रवींद्र भवनात महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात येथील ‘सकाळ’चे येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना ‘द प्राईड ऑफ इंडिया : भास्कर अॅवॉर्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर, प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप, फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, कामगार नेते अॅड. अजितसिंह राणे, गोवा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जीवन जवारे, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर, मनीषा लोहार आदी उपस्थित होते. मोरजकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात २० वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री खेडेकर व अॅड. खलप यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मोरजकर यांचे पत्रकारितेसह सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातही योगदान आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा सहभाग आहे. ते येथील बांदा केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असून नट वाचनालयचे ते संचालक आहेत. यावेळी महाराष्ट्र व गोव्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.