चिपळूण ः कवितेतून समाज वास्तव मांडायला हवे - कवी राष्ट्रपाल सावंत

चिपळूण ः  कवितेतून समाज वास्तव मांडायला हवे - कवी राष्ट्रपाल सावंत

फोटो ओळी
- ratchl२९८.jpg ःKOP२३M०५७२६ चिपळूण ः ज्येष्ठ कली राष्ट्रपाल सावंत यांची मुलाखत घेताना प्रियंका तेंडोलकर.
-----------

कवितेतून समाज वास्तव मांडायला हवे

कवी राष्ट्रपाल सावंत ; शब्दप्रवासमध्ये संवाद कार्यक्रम
चिपळूण, ता. २९ ः कवींनी आपल्या कवितेत कल्पनारम्य वातावरणात गुंतून न राहता कवितेतून-साहित्यातून समाजवास्तवाचे दर्शन घडवायला हवे. माझी कविता ही समाजवास्तवाचे दर्शन घडवणारी व जनमानसाला थेट भिडणारी कविता आहे, असे प्रतिपादन चिपळुणातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गायक राष्ट्रपाल सावंत यांनी येथील एका प्रकट मुलाखतीत केले.
येथील भावार्थ पुस्तकालयातर्फे सहाव्या ''शब्दप्रवास'' या मालिकेतील मुलाखत-संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. लेखक कवी, गायक, शिक्षक राष्ट्रपाल सावंत यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात झाला. प्रास्ताविक प्रियंका तेंडोलकर यांनी तर ही प्रकट मुलाखत प्रेरणा करंदीकर यांनी घेतली. राष्ट्रपाल सावंत यांच्या या शब्दप्रवासाची सुरवात मुलाखतकार प्रेरणा करंदीकर यांनी एका प्रार्थनेने करायला सांगितली. त्यानुसार सावंत यांनी ''अंध आज विणवितो विश्वविधात्याला, दूरदृष्टी देशील का रे खऱ्या डोळसाला'' ही प्रार्थना अत्यंत सुंदर प्रकारे सादर केली. ते म्हणाले, माझी ही प्रार्थना रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक-माध्यमिक शाळांमध्ये म्हटली जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या ''आनंददायी काव्यमाला'' या पुस्तकाचाही शासनाने गौरव करून सर्व शाळांसाठी संदर्भ साहित्य म्हणून त्याची निवड शालोपयोगी पुस्तकामध्ये केली आहे. लहान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी कथा गोष्टीगीतांच्या माध्यमातून मांडलेले आहेत.
पोटासाठी बाप माझा लाकडं फोडत होता,
कुऱ्हाड घेऊन बाप माझा गरिबी तोडत होता!
या त्यांच्या कवितेतील काही ओळी समाजाचे भेदक वास्तव मांडताना दिसतात. ते म्हणाले, माझ्या कवितेतून स्वप्नरंजनवादी अथवा कल्पनारम्य अशा कल्पना न करता समाजाचे विविध प्रश्न, समस्या थेटपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील जातीयता, विषमता, अंधश्रद्धा, शिक्षण, व्यसनमुक्ती शासकीय योजना, समाजप्रबोधन अशा वेगवेगळ्या विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या कवितेतून केलेला आहे. त्यामुळे ही कविता किंवा गाणी ही केवळ मनोरंजनाची न ठरता ती समाजाचे प्रबोधन करणारी काव्यफुले आहेत.
या वेळी त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रद्धाविषयक प्रबोधन करणारी गाणी सादर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी प्रबोधनगीते उत्कृष्टपणे सादर केली. शासनाच्या तंटामुक्त गावयोजनेची माहिती व प्रबोधन करणारी गाणी एका कॅसेटद्वारे त्यांनी काढली. त्यासाठी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी गाणी गाऊन त्यांच्या गाण्याला कवितेला राजमान्यता मिळवून दिली.
--------
चौकट
जीवनपट उलगडला

मुंबईतील एका दवाखान्यातील कंपाउंडर ते एक शिक्षक व एक शिक्षक ते लेखक, साहित्यिक, कवी, गायक असा प्रवास करणाऱ्या राष्ट्रपाल सावंत यांनी आपल्या जीवनाचा पट या मुलाखतीत उलगडून सांगितला. आपले मोठे बंधू, आई-वडील, पत्नी, मुलगा, नातेवाईक या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करतानाच सामाजिक चळवळीत काम करत असल्यामुळे माझ्या साहित्यप्रवासात अनेकांचा हातभार लागल्याचेही सांगितले. कानाच्या ऑपरेशनसाठी पत्नीने दिलेले पैसे, ऐनवेळी कॅसेट काढण्यासाठी खर्च केल्याची आठवण रंजकप्रकारे सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com