चिपळूण ः सुभेदार विजय शिंदे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः सुभेदार विजय शिंदे यांचे निधन
चिपळूण ः सुभेदार विजय शिंदे यांचे निधन

चिपळूण ः सुभेदार विजय शिंदे यांचे निधन

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl296.jpg ःKOP23M05695 सुभेदार विजय शिंदे
---------

सुभेदार विजय शिंदे यांचे निधन
चिपळूण, ता. 29 ः भारतीय सैन्यातील माजी सैनिक, सुभेदार आणि नांदिवसे-स्वयंदेव गावचे पुत्र विजय मुकुंद शिंदे (वय 53) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ व बहिणी असा परिवार आहे.
सुभेदार विजय शिंदे हे 14 मराठा लाईट (एमएल) इन्फेंट्री या बटालियनमध्ये 2 जून 1987 ते 1 जुलै 2015 पर्यंत 28 वर्षे भारतीय सैन्यदलात सेवा करून निवृत्त झाले. सप्टेंबर 1988 मध्ये अंदमान निकोबार येथे पहिली नेमणूक झाली होती. त्यानंतर सोलन (हिमाचल प्रदेश), 41 आर. आर. बटालियन (जम्मू काश्‍मीर), एनसीसी बटालियन सिमाचिन ग्लेसियर अशा दुर्गम भागासह भूतान येथेही सेवा बजावली. 14 मराठा लाईट इन्फेंट्रिमध्ये प्रथम ते डेल्टा कंपनीत रूजू होते. कबड्डी खेळामध्येही त्यांची चांगली पकड होती. 14 मराठा बटालियन डिव्हिजनमध्ये कबड्डी स्पर्धेत पहिला क्रमांक आणून दिला होता. 2006 मध्ये ज्युनियर कमिशन ऑफिसर (जेसीओ) बनले. हे पद त्यांनी सन 2015 पर्यंत यशस्वीपणे सांभाळले. निवृत्तीनंतर ते मुंबई येथील गोदरेज बॉईज ॲण्ड कंपनी येथे कार्यरत होते. तिथेही त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली.