
शिवसेना शिंदे गटामधील आयेशा सय्यद काँग्रेसमध्ये
05738
कणकवली : येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात आयेशा सय्यद यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अमृता मालंडकर यांनी त्यांचे स्वागत केले.
शिवसेना शिंदे गटामधील
आयेशा सय्यद काँग्रेसमध्ये
कणकवली, ता.२९ : शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख आयेशा सय्यद यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कणकवली काँग्रेस पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आणि महिला तालुका अध्यक्ष अमृता मालडंकर यांनी आयेशा सय्यद यांचे पक्षात स्वागत केले. तसेच काँग्रेस पक्षामध्ये सय्यद यांचा यथोचित सन्मान केला जाईल, अशी ग्वाही दिली. ‘‘शिवसेना शिंदे गट पक्षात घुसमट झाल्यामुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला,’’ अशी माहिती सय्यद यांनी दिली.
सय्यद यांच्याकडे काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सहमतीने देण्यात आल्याची माहिती प्रदीप मांजरेकर यांनी दिली. या कार्यक्रमात अक्षय घाडीगावकर यांना कणकवली शहर युवक उपशहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, तालुका सरचिटणीस महेश तेली, शहराध्यक्ष अजय मोरये, गौरी तेली, डॉ.प्रमोद घाडीगावकर, प्रदीप कुमार जाधव, अमित मांडवकर, निलेश मालडंकर, अक्षय घाडीगावकर, पंढरी पांगम आदी उपस्थित होते.