रत्नागिरी ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा
रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

अपघातप्रकरणी बसचालकावर गुन्हा
रत्नागिरी ः गोवा ते मुंबई मार्गावरील हातखंबा-दर्गा येथील उतारात झालेल्या अपघातप्रकरणी बसचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशफी खान (पूर्ण नाव महित नाही. रा. मध्य प्रदेश) असे संशयित बसचालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) सकाळी पावणेबाराच्या सुमारास हातखंबा दर्गा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चालक खान बस (एमपी ४१ पी १६२४) घेऊन गोवा ते मुंबई रस्त्यावर हातखंबा-दर्गा येथे बस भरधाव वेगाने चालवून दोन दुचाकी, दोन मोटार तसेच बसच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

चक्कर आल्याने प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारासाठी येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दिगंबर गणपत कांबळे (वय ५४, रा. आंबेडकरवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २७) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांना अचानक चक्कर येऊन घरातच पडले. उपचारासाठी त्यांना नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दारू विक्रीप्रकरणी संशयितावर गुन्हा
रत्नागिरी ः अवैध गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शत्रुघ्न भाटकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) शहरातील चर्मालय येथील मोगल मटणशॉपच्या बाजूला पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील झाडीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित भाटकर हे अवैध गावठी हातभट्टीची दारू स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत

रेशनकार्डवरून मारहाण; दोघांवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील करबुडे-पाचकुडे येथे रेशनकार्ड देण्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीपत गंगाराम पाचकुडे व स्वप्नील बाळू पाचकुडे अशी संशयितांची नाव आहेत. ही घटना शनिवारी (ता. २७) सायंकाळी सातच्या सुमारास करबुडे-पाचकुडे मावळतीवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपत गंगाराम पाचकुडे (वय ५०, रा. करबुडे मावळतीवाडी, रत्नागिरी) व संशयित श्रीपत पाचकुडे सख्खे भाऊ आहेत, तर स्वप्नील पाचकुडे हा शेजारी राहणारा आहे. फिर्यादी गणपत पाचकुडे हे श्रीपतकडे रेशनकार्ड मागण्यासाठी गेले होते त्या वेळी त्यांनी रेशनकार्ड देणार नाही, असे सांगितले. गणपत यांनी रेशनकार्ड मला हवे आहे. मला उद्या धान्य घ्यायचे आहे, असे सांगितले. त्या वेळी श्रीपत याने त्यांना मारहाण केली तर संशयित स्वप्नील पाचकुडे यांनी लोखंडी सळी हातात घेऊन गणपत यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी गणपत पाचकुडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.