राजापूर ः राजापुरमध्ये एसटी डेपोसमोरील काम सुरू

राजापूर ः राजापुरमध्ये एसटी डेपोसमोरील काम सुरू

(टीप- आजच्या बिग स्टोरीचा फोटोही घ्यावा.)

सकाळ बातमीचा परिणाम.......... लोगो

फोटो ओळी
-rat२९p१८.jpg ः KOP२३M०५७४० राजापूर ः एसटी डेपोसमोर जेसीबीच्या साह्याने सुरू झालेले काम.


राजापुरमध्ये एसटी डेपोसमोरील काम सुरू

आज बांधकाममंत्री करणार पाहणी ; अपेक्षा वाढल्या
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात काही महत्वाच्या ठिकाणचे आणि सर्व्हिस रोडचे काम अद्यापही रखडलेले आहे. याबाबत ''सकाळ''ने सोमवारी (ता. २९) सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनासह सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील एसटी डेपोसमोरील रखडलेल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी या ठिकाणी खडी टाकण्यात आली. जेसीबीसह अन्य मशिनरीच्याच साह्याने या ठिकाणी सपाटीकरण, खोदाई आणि साफसफाई सुरू करण्यात आली. आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी (ता. ३०) जिल्हा दौर्‍यावर येत असून ते मुंबई-गोवा महामार्गाच्या तळगाव ते वाकेड भागातील कामाची पाहणी करणार आहेत.
शहरातील पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलासह अर्जुना नदीवरील सर्वाधिक मोठ्या उंचीच्या पुलाच्या उभारणी होऊन त्यावरील वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही पुलामधील आणि एसटी डेपोसमोर भुयारी मार्ग उभारायचा की जंक्शन करायचे, याच्या वादामध्ये येथील काम रखडले आहे. दुसर्‍या बाजूला पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलाच्या येथील सर्व्हिस रोड, वाटूळ येथील उड्डाणपुलाच्या येथील सर्व्हिस रोड, उन्हाळे आरेकरवाडी आणि कोदवली येथील वळणाचा भाग या ठिकाणी रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले आहे.त्या ठिकाणचा भाग नागमोडी वळणांचा असून हा परिसर अपघातग्रस्त आहे. या रखडलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या धोक्याबाबत ''सकाळ''ने आज वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर रखडलेले काम तातडीने सुरू व्हावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com