‘बँडेड रेसर’ सापाला
आंगणेवाडीत जीवदान

‘बँडेड रेसर’ सापाला आंगणेवाडीत जीवदान

05772
आंगणेवाडी ः येथील माळरानावर आढळलेला ‘बँडेड रेसर’.

‘बँडेड रेसर’ सापाला
आंगणेवाडीत जीवदान
मालवण : आंगणेवाडी माळरानावर आढळलेल्या ‘बँडेड रेसर’ या सापाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिनविषारी साप असून दक्षिण कोकणात त्याला ‘नायकुळ’ तर विदर्भात ‘धूळनागीन’ म्हणतात. आंगणेवाडी माळरानावर काहीसा वेगळा असलेला हा साप दिसून आल्यानंतर बाबू आंगणे यांनी सर्पमित्र परुळेकर यांना पाचारण केले. त्यांनी या सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. याची सरासरी लांबी एक ते दीड मीटरपर्यंत असते. रंग फिकट किंवा गडद तपकिरी, शरीर लांब, निमुळते टोकदार डोके, शेपूटही लांब व निमुळती असते. प्रमुख खाद्य उंदीर असल्यामुळे हा साप शेतकऱीमित्र म्हणून ओळखला जातो. या सापाचे वास्तव्य गवतात, झुडपात, उंदरांच्या बिळात किंवा दगडांमध्ये असते. हा साप दिनचर म्हणजे दिवसा फिरणारा असून डिवचले गेल्यास मानेचा भाग फुगवतो. त्यामुळे काहीसा नागासारखा दिसत असल्यामुळे याला विषारी नाग समजून हत्या होते, अशी माहिती सर्पमित्र परुळेकर यांनी दिली. त्यामुळे कोणत्याही प्रजातीचा साप दिसून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रास बोलावण्याचे आवाहन परुळेकर यांनी केले.
.................
05771
मालवण : सांडपाणी टाकी फुटून बसस्थानक परिसरात पसरलेले दुर्गंधीयुक्त पाणी.

मालवण बसस्थानकात दुर्गंधी
मालवण : येथील बसस्थानक कंट्रोल केबिन व प्रवासी बसण्याच्या बाजूला असलेली सांडपाण्याची टाकी फुटून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. दुर्गंधीने प्रवासी व एसटी कर्मचारी त्रस्त बनले आहेत. सांडपाणी वाहनाद्वारे उपसा करून नेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पैसे भरले आहेत; मात्र दहा दिवस उलटूनही मैला उपसा वाहन आले नसल्याचे वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका प्रवासी वर्ग व एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. परिसरातील सांडपाणी व दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com