माजगाव ग्रामपंचायतीतर्फे बियाणे

माजगाव ग्रामपंचायतीतर्फे बियाणे

०५७१४
असलदेः वृद्धाश्रमात आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करताना डॉ. तपसे.

असलदे आश्रमातील वृद्धांची
मोफत आरोग्य चिकित्सा
नांदगाव ः नियमित सामाजिक उपक्रमांत सहभागी होणारे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तपसे यांच्यावतीने रविवारी (ता. २८) असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले. असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करून मोफत गोळ्या, औषधे देण्यात आले. वृद्धाश्रमात ४६ आजी-आजोबा आहेत. त्यापैकी ३८ जणांची रक्तदाब, मधुमेह, नेत्र, त्वचा व सर्वसाधारण चिकित्सा डॉ. तपसे यांनी केली. गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सेवा बजावून सुद्धा वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी करून डॉ. तपसे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
...............
05782
माजगाव : भात बियाण्याचे वाटप करताना सरपंच अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजरे.

माजगाव ग्रामपंचायतीतर्फे बियाणे
सावंतवाडी ः खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना माजगाव ग्रामपंचायतीकडून ५० टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत असून याचा प्रारंभ आज सरपंच अर्चना सावंत व उपसरपंच बाळा वेजरे यांच्या हस्ते झाला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात हे भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. शेतकऱ्यांनी येताना ‘आठ अ’ व ‘सातबारा’ घेऊन यावे, असे आवाहन सरपंच सावंत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com