भाजपतर्फे आजपासून विशेष अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपतर्फे आजपासून विशेष अभियान
भाजपतर्फे आजपासून विशेष अभियान

भाजपतर्फे आजपासून विशेष अभियान

sakal_logo
By

भाजपतर्फे आजपासून विशेष अभियान
वेंगुर्ले ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उद्या (ता.३०) ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ३० मे ते ३० जून या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष जनसंपर्क अभियान होणार आहे. जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र व बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली. या अभियानाची नियोजन सभा अभियानाचे जिल्हा सहसंयोजक प्रसन्ना देसाई, प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. तालुक्यातील सर्व २१ शक्तीकेंद्रांवर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ‘संफ ते समर्थन’ या अंतर्गत तालुक्यातील प्रमुख घटकातील प्रभावशाली व्यक्ती, खेळाडू, कलाकार, उद्योजक, हुतात्मा सैनिक तसेच अन्य कुटुंबांशी संपर्क करण्यासाठी यादी केली आहे. बुद्धिवंतांच्या संमेलनासाठी तालुक्यातील बुद्धिवंतांची यादी बनविण्यात आली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन आदी कार्यक्रमांबाबत चर्चा करून प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली.