हृदयविकाराच्या झटक्याने 
मडुरे येथे तरुणाचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने मडुरे येथे तरुणाचा मृत्यू

05790
सचिन गावडे

हृदयविकाराच्या झटक्याने
मडुरे येथे तरुणाचा मृत्यू

बांदा,ता.२९ ः मुलांसमवेत क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मडुरेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सचिन दिगंबर गावडे (४४, रा. मडुरा भरडवाडी), असे त्यांचे नाव आहे. ते नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबीसोबत सुटीला मडुरा गावी आले होते.
रविवारी सायंकाळी ते घरातील लहान मुलांसोबत साई मंदिर परिसरात गेले होते. त्यांच्या सोबत क्रिकेट खेळत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याच ठिकाणी चक्कर येऊन ते खाली कोसळले. माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम परब यांनी त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले; मात्र, त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका तसेच यकृताच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदनानंतर दिली. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यू, अशी नोंद झाली. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, वहिनी, मुलगा, मुलगी, पुतणे असा परिवार आहे. मडुरेत सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com