Sat, Sept 23, 2023

मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा
मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा
Published on : 29 May 2023, 3:50 am
मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा
कुडाळ ः राहुल मारूती राठोड (वय २२, रा.मस्जिद मोहल्ला, रेल्वेस्टेशन नजिक कुडाळ) याला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मनसूर बाबुराव मुल्ला (वय २३, रा. गोधडवाडी कुडाळ) याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता.२९) सकाळी घडली. फिर्यादीत म्हटले आहे की, मनसूरने मोबाईलद्वारे संपर्क साधून राहुलला गोधडवाडी रेल्वे पुलाकडे भेटायला बोलावले. त्यानंतर धमकी देत टी शर्टमध्ये लपवलेला लोखंडी रॉड काढून राहुलच्या डोक्यावर मारून जखमी केले. याबाबतची फिर्याद राहुलने कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मनसुर याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.