लांजा ः लग्नसमारंभातून एसटीला पावणे नऊ लाखाचे उत्पन्न

लांजा ः लग्नसमारंभातून एसटीला पावणे नऊ लाखाचे उत्पन्न

लांजा आगाराला पावणे नऊ लाखाचे उत्पन्न
लग्नसमारंभ ; वीस दिवसात ६७ गाड्या आरक्षित
लांजा, ता. ३० ः लग्नसमारंभासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक, खासगी बस यासारख्या खासगी गाड्यांतून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून लांजा एसटी आगाराने लग्नसमारंभासाठी शासकीय दरात एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये १ ते २० मे या कालावधीत एकूण ६७ गाड्या आरक्षित करण्यात आल्या. यामधून लांजा आगाराला ८ लाख ७६ हजार ८१० रुपयांचे उत्पन्न मिळाले. याला लांजा आगाराच्या अधिकाऱ्यांनी दूजोरा दिला आहे.
लग्नसराई म्हटली की, सगळीकडेच धामधुम चालू असते. लग्नासारख्या मंगल सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मग आजही गावकऱ्यांची धावपळ सुरू असते. लग्नासाठी ग्रामीण भागात सर्रासपणे ट्रक किंवा अन्य खासगी गाड्यांचा आधार घेतला जातो. अशा वाहनांतून प्रवास करणे धोकादायक ठरते. हे लक्षात घेऊन लांजा एसटी आगाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखील आपल्या नियमित फेऱ्यांवर ताण पडणार नाही याबाबतची खबरदारी घेऊन खास लग्नसमारंभासाठी एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. यावर्षी मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त सर्वाधिक असल्याने लग्नसमारंभासाठी गाड्यांचे आरक्षण झाले होते. त्यामध्ये १ ते २० मे या कालावधीत एकूण ६७ गाड्यांचे बुकिंग झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लांजा एसटी आगाराने लग्न समारंभासाठी एसटी गाड्या जास्त उपलब्ध करून दिल्याने आगाराच्या उत्पन्नातदेखील वाढ झाली आहे. या बुकिंग झालेल्या ६७ एसटी बसगाड्यांनी १५ हजार ९४२ किमी अंतर पार केले. या गाड्यांच्या माध्यमातून लांजा आगाराला ८ लाख ७६ हजार ८१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com