मुस्लिमवाडी पुलाच्या कामाची भाजप, अधिकाऱ्यांकडून पाहणी

मुस्लिमवाडी पुलाच्या कामाची 
भाजप, अधिकाऱ्यांकडून पाहणी

05835
वेताळ बांबर्डे ः मुस्लिमवाडी आणि महामार्ग जोडणाऱ्या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली.

मुस्लिमवाडी पुलाच्या कामाची
भाजप, अधिकाऱ्यांकडून पाहणी
कुडाळ ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडी आणि महामार्ग जोडणाऱ्या पुलाचे काम मागील १० ते १२ दिवस सुरू होते. हे काम पूर्ण झाल्याचे महामार्ग ठेकेदार कंपनीने दाखविले; मात्र प्रत्यक्षात ठेकेदार कंपनीने केलेले काम बोगस असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला होता. याबाबत मुस्लिमवाडीतील स्थानिक नागरिकांनी भाजप युवा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्याकडे या प्रकरणाबाबत गाऱ्हाणे मांडले. त्यानुसार सावंत यांनी महामार्ग ठेकेदार जाधव आणि साळुंखे यांना प्रत्यक्षात पुलाच्या ठिकाणी आणून कामाची पाहणी केली. यावेळी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी भाजप पदाधिकारी अवधूत सामंत, आरिफ मुजावर, अब्दुल रेहमान, अब्दुल्ला आगा, ननहू शेख, रोहित कदम, अरविंद बांबर्डेकर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
.............
युवा रक्तदात्यांतर्फे तातडीने रक्तदान
सावंतवाडी ः येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या मंजिरी कांबळी (रा. वारखंड, गोवा) या महिलेला पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान ‘एबी प्लस पॉझिटिव्ह’ या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये या रक्ताचा तुटवडा असल्याने शस्त्रक्रियेस अडथळा निर्माण झाला होता. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. अमित आवळे यांच्याशी संपर्क साधत ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे सावंतवाडीतून रक्तदाते पाठवून व्यवस्था केली. मयुरेश निब्रे, आकाश सासोलकर, शुभम गावडे, ज्ञानेश्वर पाटकर यांनी रक्तदान केले. त्यामुळे गुरुवारी (ता. १) ही शस्त्रक्रिया होणार आहे. या सामाजिक कार्याबाबत सूर्याजी यांच्यासह दात्यांचे व युवा रक्तदाता संघटनेचे तसेच जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे कांबळी कुटुंबीयांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com