Fri, Sept 22, 2023

कुडाळ परिसरात आगीत
काजू कलमे जळून खाक
कुडाळ परिसरात आगीत काजू कलमे जळून खाक
Published on : 30 May 2023, 11:55 am
05837
कुडाळ ः गोधडवाडी परिसरात लागलेली आग.
कुडाळ परिसरात आगीत
काजू कलमे जळून खाक
कुडाळ ः शहरातील गोधडवाडी नजीक माळरानाला रविवारी (ता. २८) रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली. तेथील काजू कलमे या आगीत जळून खाक झाली. येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या माळरानानजीक लोकवस्ती असून याबाबतची माहिती नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला देत अग्निशमन बंब पाचारण केला. लागलीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. नगरपंचाय़तीचे कर्मचारी गोट्या कोरगावकर, सतीश जाधव, संजय टेंबुलकर यांच्यासह स्थानिकांनी आग आटोक्यात आणली.