गुहागर ः भातगांव रस्त्यावरील भरलेले खड्डे

गुहागर ः भातगांव रस्त्यावरील भरलेले खड्डे

आदेश मिळाल्यानंतर पाच महिन्यांनी खड्डे भरणी

नीलेश सुर्वे ; भातगाव रस्त्यावरील खड्डे भरणी निकृष्ट दर्जाची

गुहागर, ता. ३० ः तालुक्यातील मासू, आवरे-असोरे, भातगाव या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. शिवाय याच रस्त्याच्या नूतनीकरण सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी ५ कोटी मंजूर केले आहेत. हे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गुहागर यांच्यामार्फत हे काम का सुरू आहे, असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येकी १२ किमीमधील खड्डे भरण्याचे काम ठेकेदार दीपक जाधव यांना ८ डिसेंबर २०२२ आणि सोनाली कन्स्ट्रक्शन यांना २७ डिसेंबर २०२२ ला आदेश मिळाले. ४५ लाख ६३ हजार ६३३ रुपये मंजूर झाले. कामाची मुदत १२ महिने असून रस्ता सुस्थितीत ठेवण्याचा कालावधी २४ महिन्याचा आहे. या २४ किमीच्या रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की, दोन्ही ठेकेदारांना रस्त्यावर बहुतांशी ठिकाणी पॅचिंग करावे लागणार होते.
दरम्यान, आंबेरे खुर्दचे सरपंच रवींद्र अवेरे यांनी २४ एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना पत्राद्वारे नक्की कोणते खड्डे बुजवणार याबाबत या रस्त्याशी संबंधित सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांसोबत पाहणी करून निश्चित करावे, असे कळवले होते; मात्र उपअभियत्यांनी या पत्राबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. तसेच १५ मे च्या दरम्यान खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरवात केली. याबाबत नीलेश सुर्वे म्हणाले, सध्याचे कामही निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळ्यात पुन्हा हा रस्ता खड्ड्यातच जाणार आहे. काम करण्याचे आदेश डिसेंबरमध्ये मिळाल्यानंतर ५ महिन्यांनी या कामाला का सुरवात झाली? सरपंच अवेरे यांच्या पत्राप्रमाणे कोणते खड्डे भरायचे याची निश्चिती का झाली नाही? असा रस्ता पावसाळ्यात सुस्थितीत ठेवणार म्हणजे ठेकेदार नेमके काय करणार? पावसाळ्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. या कामाची खरोखरच गरज होती का? या संपूर्ण प्रकरणाला वेगळाच वास येतोय. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांनी या कामाची चौकशी करावी. या निकृष्ट कामाचे कोणत्याही प्रकारचे बील आंबेरे, आवरे-असोरे, पाचेरीसडा, शिवणे, भातगाव, कोळवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विश्वासात घेतल्याशिवाय संबंधित ठेकेदारांना देण्यात येऊ नये, अशी मागणी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनाही याबाबत कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com