रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

कथा-गायनातून उलगडणार
शिवरायांचा इतिहास
रत्नागिरी ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष सुरू आहे. त्याचे औचित्य साधून उद्यापासून येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवराजांचे अलौकिक जीवन उलगडणाऱ्या ''शिवकथा'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकार श्रीनिवास पेंडसे हे शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणार असून, रत्नागिरीतील कलाकार गीतांमधून शिवरायांचे गुणगान सादर करणार आहेत.
३१ मे ते २ जून असा तीन दिवसांचा हा कार्यक्रम झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनमध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या दरम्यान होणार आहे. जुलमी राजवटी नष्ट करून शिवबांनी ''हिंदवी स्वराज्य'' निर्माण केले तो दिवस म्हणजेच ''शिवराज्याभिषेक दिन''. शिवरायांचा हा इतिहास आपल्यासमोर पेंडसे कथेच्या आणि रत्नागिरीतील संध्या सुर्वे, श्वेता जोगळेकर, करुणा पटवर्धन, तन्वी मोरे, जुई डिंगणकर, नरेंद्र रानडे, भूषण शितूत हे गायक गीतांच्या स्वरूपात मांडणार आहेत. त्यांना हेरंब जोगळेकर, श्रीरंग जोगळेकर, चैतन्य पटवर्धन, मंगेश मोरे, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, पांडुरंग बर्वे, अद्वैत मोरे आदी कलाकार संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीतसंयोजन श्वेता आणि हेरंब जोगळेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे झाडगाव वस्तीप्रमुख शुभम घगवे, सहवस्तीप्रमुख डॉ. सुश्रुत केतकर, मांडवी वस्तीप्रमुख नीलेश रहाटे यांनी केले आहे.


ज्येष्ठ नागरिकांचा आज स्नेहमेळावा
रत्नागिरी ः शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बुधवारी (ता. ३१) स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्नेहमेळावा सकाळी भाट्ये समुद्रकिनारी सकाळी साडेनऊ ते चार या वेळेत होणार असून, आश्रय ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित करण्यात आला आहे. दररोजच्या जीवनशैलीतून एक दिवस मनमुराद गप्पा, मनोरंजन, आरोग्य आणि इतर माहिती तसेच एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान असे कार्यक्रम या स्नेहमेळाव्यात असणार आहेत. सेवानिवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे जीवन हे एकाकी असते. धकाधकीच्या जीवनात आपल्यासाठी वेळ काढणेही ज्येष्ठ नागरिकांना काही वेळेला शक्य होत नाही. या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करावे, त्यांना दैनंदिन जीवनातून काही वेळ स्वतःसाठी काढता यावा यासाठी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेने पुढाकार घेतला आहे.


रत्नागिरीत ५ जूनला लोकशाही दिन
रत्नागिरी ः जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. जून २०२३चा लोकशाही दिन येत्या ५ जूनला दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे. नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तेथील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तर लोकशाही दिनात अर्ज करावा असे करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com