कोनशी प्रकरणातील संशयितास कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोनशी प्रकरणातील संशयितास
कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करा
कोनशी प्रकरणातील संशयितास कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करा

कोनशी प्रकरणातील संशयितास कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करा

sakal_logo
By

05871
पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना निवेदन देताना अर्चना घारे-परब. बाजूला पुंडलिक दळवी व अन्य.

संशयितास कठोर शिक्षेसाठी
प्रयत्न करा ः अर्चना घारे

महिला आयोग अध्यक्षांना निवेदन

सावंतवाडी, ता. ३० ः तालुक्यातील एका मुलीचा विनयभंग करून तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली.
राष्ट्रवादीच्या घारे-परब यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर केले. त्यानी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बाबलो शंकर वरक या युवकाने हे कृत्य केले. मुलीचा विनयभंग करून तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. असे असले तरी संबंधित युवकाला जामीन मंजूर होऊ नये, यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करून संबंधित पीडित मुलीला न्याय द्यावा. यावेळी चाकणकर यांनी या प्रकरणांमध्ये जातीनिशी लक्ष घालण्याबरोबरच संबंधित युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. शिवाय तत्काळ सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांना फोन करून विशेष लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व पदाधिकारी उपस्थित होते.