गुहागर ः हेदवी बामणघळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे

गुहागर ः हेदवी बामणघळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे

-rat३०p२२.jpg ः KOP२३M०५८९३ हेदवीची बामणघळ
-----------------
हेदवी-बामणघळीचा पर्यटनस्थळदृष्ट्या विकास हवा

नीलेश सुर्वे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी
गुहागर, ता. ३० ः पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनाऱ्याचा नव्याने विकास करावा, हेदवी येथील दुर्लक्षित बामणघळ येथे सुरक्षित रस्ता व कठडा बांधावा, गुहागर, वेळणेश्वर व पालशेत येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी सोईसुविधा द्याव्यात, अशा मागण्या भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता या खात्यांचे मंत्री मंगलप्रभात लोढा रत्नागिरी येथे आले होते. त्या वेळी भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी त्यांची भेट घेतली. तवसाळ, हेदवी, वेळणेश्वर, पालशेत व गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावल लोढा यांनी केवळ मागणी करू नका, कोणत्या कामांची आवश्यकता आहे त्याचे लेखी पत्र देण्यास सांगितले. सुर्वे यांनी तत्काळ सुमारे १ कोटी ६० लाखाच्या निधीची मागणीचे पत्र त्यांना दिले.
जयगड तवसाळ फेरीबोट, अँगलिंग फिशिंग, ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनामुळे तवसाळ येथील समुद्रकिनाऱ्यावरही आता पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा तवसाळ खुर्द सावर्डे ते तवसाळ बंदर रस्ता रस्ता तयार करणे (२५ लाख रु.), तवसाळ खुर्द समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकरिता आसनव्यवस्था करणे (५ लाख), तवसाळ खुर्द फेरीबोट धक्का, गणपती मंदिर ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत सौरपथदीप बसवणे (१५ लाख), तवसाळ ‌खुर्द येथील घोडबावीचे सुशोभीकरण करणे (१० लाख), तवसाळ काशिवडे समुद्रकिनारी पर्यटकांकरिता आसनव्यवस्था करणे (५ लाख) अशी कामे सुर्वे यांनी सुचवली आहेत.
हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बामणघळ येथे पावसाळी पर्यटन बहरू शकते. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे तसेच वर्षभरात उधाणाची भरती येते त्या वेळी बामणघळीतून निसर्गनिर्मित २५ ते ३० फूट उंच उडणारे पाण्याचे फवारे पर्यटकांना आकर्षित करू शकतात; मात्र तेथे संरक्षक कठडा आणि सुरक्षित रस्त्याची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन हेदवी स्मशानभूमी ते ब्राह्मण घळपर्यंत रेलिंगसह आरसीसी पाखाडी बांधणे (२५ लाख), हेदवी येथील पर्यटकांना आकर्षित करणारी बामणघळ संरक्षित करणे (१० लाख), हेदवी समुद्रकिनारी सौरपथदिवे बसवणे (५ लाख), हेदवी जालगावकरवाडी ते उमामहेश्वर मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१५ लाख) या कामांची मागणी केली आहे. याशिवाय गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकरिता अद्ययावत चेजिंग रूम व शौचालयाची व्यवस्था (१५ लाख), गुहागर समुद्रकिनाऱ्यावरती लहान मुलांकरिता फायबरच्या खेळण्याची व्यवस्था करणे (१५ लाख), पालशेत समुद्रकिनारी पर्यटकांकरिता आसनव्यवस्था तयार करणे (५ लाख), पालशेत मुख्य रस्ता ते पालशेत बंदर टोक रस्ता तयार करणे (१० लाख), वेळणेश्वर समुद्रकिनारी पर्यटकांना बसण्याकरिता गॅलरी बांधणे (१५ लाख) या कामांची मागणी सुर्वे यांनी लोढा यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com