वेंगुर्लेत ३९ वर्षांनी एकवटले सवंगडी

वेंगुर्लेत ३९ वर्षांनी एकवटले सवंगडी

05898
वेंगुर्ले ः स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित पाटकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी.

वेंगुर्लेत ३९ वर्षांनी एकवटले सवंगडी

पाटकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

वेंगुर्ले, ता. ३० ः येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या १९८४ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. यानिमित्त तब्बल ३९ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आले. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी १०५ माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
स्नेहमेळाव्यानिमित्त आयोजित ड्रेसकोड कार्यक्रम खास आकर्षण ठरला. सुरुवातीला दिवंगत विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी परिचय करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शैलेश जामदार आणि अनिता आरोंदेकर यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. या स्नेहमेळाव्याच्या नियोजनासाठी जॉन्सन डिसोजा, शिरिष कोरगावकर, बाळा शिरसाट, प्रसाद महाले, स्वाती प्रभू, शहनाज शेख, नितीन सावंत, अॅड. जी. जी. टांककर, भगवान मसूरकर, जाफर शेख, जयंत भाटिया, उमेश चव्हाण, मनोज आरोसकर, भूषण नाबर व पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांनी मेहनत घेतली. भगवान मसूरकर, शिरीष कोरगावकर व अभय आरोंदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com