संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो ओळी
-rat30p21.jpg ः KOP23M05892 आसूद ः येथील केशवराज मंदिर परिसराची स्वच्छता करणारे विद्यार्थी.
-----------

केशवराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम
दाभोळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या उद्यानविद्या महाविद्यालय दापोलीच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी आसूद येथील प्रसिद्ध अशा केशवराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. आसूद येथील केशवराज मंदिर हे प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिर असून, ते पर्यटनस्थळ असल्याने मोठ्या संख्येने येथे येत असतात. या परिसरात कचऱ्यामध्ये वाढ झालेली असल्याने उद्यानविद्या महाविद्यालय दापोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी या योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. बी. थोरात, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतामोहीम राबवली. यात डॉ. तोरणे, विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धेश माळी, स्वयंसेवक नागेश घाणेकर, मकरंद जाधव, कुणाल शेडगे, आदित्य मेंगे, स्वप्नील जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.

सुधीर कदम यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिर
दाभोळ ः शिवसेना दापोली विधानसभा मुंबई संपर्कप्रमुख सुधीर कदम यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त युवा फाउंडेशन मुंबईच्यावतीने सर जे. जे. रुग्णालयाचा रक्तपेढी विभाग यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दादर (प.) येथील पाटील मारूती मंदिर हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


आडे येथे टॅंकरने पाणीपुरवठा
दाभोळ ः उष्णतेत वाढ झाल्याने पाणीपातळीमध्ये कमालीची घट होत आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यात आडे येथे देखील पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीच्या पाणीपातळीत घट झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. आडे गावात ग्रामपंचायतीकडून लोणवडी येथून नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र तेथील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पाण्याची टाकी भरण्यासाठी मोठा कालावधी लागतो. ८ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागत असल्याने या वाड्यांना पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टँकरची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.


दापोली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर
दाभोळ ः दापोली शहरामध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दापोली नगरपंचायतीकडून नुकतेच भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. तेव्हापासून दापोली शहरात कुत्र्यांची संख्या कमी झाली होती; मात्र आता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कुत्रे फिरत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे तरी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नवीन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेतर्फे सत्कार
खेड ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे बारावीत उत्तीर्ण झालेल्या साक्षी जैन, रोशनी देवळेकर, आयुष मोरे, रूद्र शेठ, मिनार गुजर, अनुष्का सकपाळ या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, शहराध्यक्ष सिद्धेश साळवी, लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे, जयेश गुहागरकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com