रत्नागिरी ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा
रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

नांदिवडे रस्त्यालगत जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड ते नांदिवडे जाणाऱ्या रस्त्यालगत मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये जुगाराच्या साहित्यासह १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दत्ताराम सोनू मायंगडे (वय २६, रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.२९) सायंकाळी सहाच्या सुमारास नांदिवडे रस्त्यालगत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मायंगडे हा रस्त्यालगत मटका जुगार चालवत असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाटव-वाडीबीड येथे एकास मारहाण
खेड ः तालुक्यातील चाटव-वाडीबीड येथे एकास शिवीगाळ व मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश सखाराम कदम, स्वाती सतीश कदम यांच्यासह अन्य दोन मुली अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रकाश गणपत भोसले, हरिश्चंद्र लक्ष्मण कदम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जनरल स्टोअर्समध्ये गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा करून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या कदम कुटुंबीयांनी घराबाहेर बोलावून हातातील काठीने पायावर, पाठीवर मारहाण करून कानाला दुखापत केली तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सुसेरीत तरुणाचा गूढ मृत्यू
खेड ः तालुक्यातील खाडीपट्ट्यातील सुसेरी नं. १ मधील बौद्धवाडीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. तुषार सुनिल शिर्के (वय ३२, रा. सुसेरी नं. १ खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २६) मे रोजी सकाळी साडेदहा ते रात्री पावणेनऊ वाजता गुरांच्या गोठ्यात घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसेरी नं. १ मधील बौद्धवाडीतील गुरांच्या गोठ्यात तुषार शिर्के हे कपडे काढलेल्या व मृतावस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी कळंबणी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

कोतवलीत ६ खातेदारांची फसवणूक, डाकपालावर गुन्हा
खेड ः तालुक्यातील कोतवली येथील ६ खातेदारांना विश्वासात न घेता त्यांच्या बचतखात्यातील १ लाख १२ हजार ५०० रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली. संशयित डाकपाल समीर रामचंद्र काणेकर यांच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मे २०२० ते १३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडली. कोतवलीतील शाखेच्या डाकघर कार्यालयात समीर काणेकर डाकपाल पदावर कार्यरत आहेत. पदाचा गैरवापर करत १ लाख १२ हजार ५०० रूपये रक्कमेचा बनावट दस्तऐवज, मौल्यवान रोखे/चलन तयार केले तसेच खातेदारांचा विश्वास संपादित करत त्यांनी खात्यात भरणा करण्याकरिता दिलेली रक्कम त्यांच्या नावे जमा न करता खातेदारांच्या नकळत स्वतःच्या फायद्याकरिता आर्थिक लुबाडणूक करून अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
---------