रत्नागिरी-सुधारित बातमी

रत्नागिरी-सुधारित बातमी

माहितीसाठी

(पान 1 साठी)

फोटो ओळी
-rat30p34.jpg- रत्नागिरी ः दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने झाडगाव झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक नळाव पाणी भरण्यासाठी महिलांनी अशी गर्दी केली होती.
--------------

शीळ धरणातील पाणी महिनाभर पुरेल, टंचाई नाही

रत्नागिरी पालिकेचा दावा; शहरात टंचाई भागात टॅंकद्वारे पाणी

राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 30 ः रत्नागिरी शहरवासीयांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाई अधिक गडद होऊ नये, यासाठी पालिकेने एप्रिलमध्ये नियोजन करून दिवासाआड पाणी पुरवठा सुरू केला. शीळ धरणामध्ये अजून 0.533 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. पुढील 30 दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याचा दावा पालिकेचा आहे. शहरात आजही काही भागांमध्ये टंचाई स्थिती आहे. दिवसाला टंचाईग्रस्त भागात टॅंकरच्या 10 ते 12 फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. पालिकेद्वारे मागील त्याला पाणी टॅंकर दिला जात असल्याचे पालिकेच्या पाणी विभागाकडून सांगण्यात आले. शीळ धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे पालिका सांगत असली तरी झाडगाव, जोशी पाळंद, साळवी स्टॉप भागात पाणी नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. शहरातील अनेक पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी विहिरीदेखील आटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची भिषणता दिसत आहे. शहराला सुमारे साडेदहा हजार नळजोडणीधारकांना दिवसाला 18 ते 20 एमएलडी पाणी पुरवले जाते. आता दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याने एका दिवसाची बचत होते.
शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठ्याची सवय आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी तो मुबलक केला जातो; मात्र अनेक अपार्टमेंट किंवा काही भागातून वारंवार पाण्याची मागणी होते. त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाण्याव्यतिरिक्त सुमारे 60 हजार ते लाख लिटर पाण्याचा जादा पुरवठा शहरात करावा लागत आहे. शहरातील वरच्या भागात सर्वांत जास्त पाण्याची मागणी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता 4.373 दशलक्ष घनमीटर एवढी आहे; परंतु आजमितीला शीळ धऱणात 0.533 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. दिवसाआड पाणी देत असल्याने पुढील 30 दिवस हे पाणी पुरेल एवढा हा साठा आहे.
------------
कोट
शहरवासीयांना अगदी जूनच्या 20 तारखेपर्यंत पाणीटंचाई भासली नाही पाहिजे याचे नियोजन आम्ही एप्रिल महिन्यातच केले होते. त्याचा नक्कीच आता फायदा झाला आहे. आत आणखी 30 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शीळ धऱणात आहे.

- तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com