राजापूर-मोटार-ट्रकच्या अपघातात पती-पत्नी जखमी

राजापूर-मोटार-ट्रकच्या अपघातात पती-पत्नी जखमी

-rat३०p३७.jpg- KOP२३M०५९४५Øराजापूर : अपघातग्रस्त गाडी
----------
मोटार-ट्रकच्या अपघातात पती-पत्नी जखमी

राजापूर, ता. ३० ः महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे हॉटेल गुरुमाउली येथे मोटार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात मोटारीतील
राजापूर कुणबी पतपेढीच्या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत.
सानिका पुजारी व संदीप पुजारी (दोघे रा. हर्डी, ता. राजापूर) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. ३०) सकाळी महामार्गावरील हॉटेल गुरूमाऊली समोर झाला. संदीप पुजारी हे मंगळवारी पत्नीला कुणबी पतपेढीच्या ओणी शाखेत सोडण्यासाठी मोटारीने जात होते. हॉटेल गुरूमाऊलीसमोर आले असता समोरून अचानक वेगाने ट्रक आला. ट्रक मोटारीच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी लगतच्या कठड्यावर आदळली. त्यानंतर ट्रकही त्याचठिकाणी उलटला आणि त्याचा काही भाग भागही मोटारीवर कोसळला. या अपघातामध्ये सानिका पुजारी यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. संदीप पुजारी हे किरकोळ जखमी झाले. दोघांनाही राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सौ. पुजारी यांच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग येथे हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच कुणबी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव यांच्यासह कर्मचारी तसेच हर्डीतील ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com