दुकान जागेवरुन ‘फ्री स्टाईल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकान जागेवरुन ‘फ्री स्टाईल’
दुकान जागेवरुन ‘फ्री स्टाईल’

दुकान जागेवरुन ‘फ्री स्टाईल’

sakal_logo
By

05964
सावंतवाडी ः येथील आठवडा बाजारात झालेल्या वादानंतर झालेली गर्दी.

दुकान जागेवरुन ‘फ्री स्टाईल’

सावंतवाडी आठवडा बाजार; अपुऱ्या जागेचा मुद्दा ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः येथील आठवडा बाजारात सायंकाळी जागेवरुन दोन व्यापाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामुळे नव्या ठिकाणी अपुऱ्या जागेचा मुद्दा पुढे आला असून पालिकेच्या कर्मचारी परवीन शेख आणि हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव यांनी दोघांत मध्यस्थी करत वादावर तोडगा काढला.
येथील मोती तलावाच्या काठावर भरवला जाणारा आठवडा बाजार अलीकडेच शासकीय गोडाऊन परिसरात भरविला जात आहे. या ठिकाणी पालिकेकडून व्यापाऱ्यांसाठी जागेचे आरक्षण निश्चित करत व्यापाऱ्यांना बसवण्यात आले आहे. मात्र, आज बाजारासाठी आलेल्या दोन व्यापाऱ्यांमध्ये सायंकाळी जागेवरून वाद उफाळून आला. गोडाऊन समोरून जागेत दुकान लावण्यावरून हा वाद झाला. मुळात या ठिकाणी गोडाऊनसाठी येणाऱ्या गाड्या लावण्यासाठी जागा सोडण्यात आली असतानाही व्यापाऱ्यांना बसवले जात आहे. आज हा प्रकार प्रकर्षाने समोर आला. या ठिकाणी कुठलीही जागा न सोडता व्यापाऱ्यांनी आपले दुकाने मांडले होते. त्याच्या बाजूला अन्य एकाने दुकान लावण्यास घेतले असता निर्माण झाला यातून दोघेही एकमेकांना चांगले भिडले. हा प्रकार पालिकेचे कर्मचारी शेख व हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष जाधव यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात वस्तूस्थिती जाणून घेतली. शिवाय ज्यांनी गोडाऊनसमोर दुकान मांडली होती, त्यांना बाजूला करून जागा मोकळी करण्यात आली तसेच वाद निर्माण झालेल्या दोघांनाही जागा उपलब्ध करून देण्यात आली.
एकूणच घडलेल्या या प्रकारानंतर नवीन जागेमध्ये व्यापाऱ्यांसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. काही व्यापाऱ्यांकडून आपल्यावर अन्याय झाला असल्याचेही बोलले जात आहे. सर्वांना समान जागेचे वाटप झाले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या ठिकाणी काहींना जास्त जागा देण्यात आली असून काहींना कमी जागा दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, झालेला हा प्रकर गैरसमजूतीमुळे झाला आहे. यावर तोडगा काढण्यात आल्याचे शेख व श्री. जाधव यांनी सांगितले.
------------