पान एक-आंबोली-रेडी रस्ता क्राँक्रीटचा होणार

पान एक-आंबोली-रेडी रस्ता क्राँक्रीटचा होणार

05963
कुडाळ ः येथे मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना सूचना देताना रवींद्र चव्हाण. शेजारी नीतेश राणे, संदेश पारकर, राजन तेली.


आंबोली-रेडी रस्ता क्राँक्रिटचा होणार
पालकमंत्र्यांची माहिती; सार्वजनिक बांधकामकडून प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्नशील असून अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी ६८ कोटींचा, तसेच जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपिंगसाठी ३८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आंबोली-रेडी रस्ता क्राँक्रीटीकरण करण्याचा प्रस्तावही असून तोही लवकरच मार्गी लावला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.
त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी झाराप येथून सुरू केली. यावेळी प्रांत ऐश्वर्या काळुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी आमदार राजन तेली, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
पत्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीकडून येणारा रस्ता यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. तेथे तसेच इन्सुली येथे पुलाच्या कामास मंजुरी दिली असून लवकरच ते पूर्ण होईल, असे सांगून चव्हाण म्हणाले, ‘‘हा संपूर्ण रस्ता पूर्वी झालेला आहे. त्यावर व्हाईट टॉपिगसाठीही मंजुरी दिली आहे. मुंबई ते गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’ आमदार नीतेश राणे, संदेश पारकर उपस्थित होते. खारेपाटणपर्यंत चव्हाण यांनी पाहणी करत महामार्ग अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थ पालकमंत्र्यांना भेटून निवेदने देत होते. ते स्वीकारून पालकमंत्र्यांनी त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कुडाळमधील ‘त्या’ जागेची पाहणी
कुडाळ येथील आरएसएन हॉटेलजवळ वारंवार होणारे अपघात रोखण्याची लोकप्रतिनिधींची मागणी होती. या ठिकाणची पालकमंत्री चव्हाण यांनी पाहणी करून तेथे आयलँड करण्याचे निर्देश यावेळी दिले. वेताळ बांबार्डे येथील प्रलंबित भूसंपादनाचे प्रस्ताव आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी प्रांतांना दिले.

चौकट
वागदे फाट्याबाबत सक्त सूचना
कणकवली-वागदे फाटा येथे पाहणी करून पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘हा ब्लॅकस्पॉट आहे. या ठिकाणी अपघात झाले आहेत. ते रोखण्यासाठी मोठे बहिर्गोल आरसे लावा. त्याचबरोबर नव्याने काही बदल करणे आवश्यक असेल तर ते करा. गरज लागली तर नवा प्रस्ताव द्या; पण ठोस उपाययोजना करा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com