निराधार योजनेंतर्गत ६५ प्रस्तावांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार योजनेंतर्गत ६५ प्रस्तावांना मंजुरी
निराधार योजनेंतर्गत ६५ प्रस्तावांना मंजुरी

निराधार योजनेंतर्गत ६५ प्रस्तावांना मंजुरी

sakal_logo
By

05976
सखाराम कदम

झाडावरून पडून जखमी
झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
ओरोस ः झाडावरून पडून गंभीर जखमी झालेले आंबडोस कदमवाडी (ता. मालवण) येथील सखाराम साबाजी कदम (वय ५२) यांचे बांबोळी-गोवा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सखाराम कदम हे नेहमी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. लाकूड तोड्याची मजुरी ते करीत असत. त्याप्रमाणे रविवारी (ता. २८) ते आपल्या वाडीतील एका आंब्याच्या झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले होते. यावेळी अचानक ते जमिनीवर पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल (ता. २९) पहाटे त्यांचा मृत्यू झाला.याच दिवशी सायंकाळी त्यांच्यावर वाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. मितभाषी व कामाशी प्रामाणिक अशी त्यांची ओळख होती. कदम यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
--
निराधार योजनेंतर्गत ६५ प्रस्तावांना मंजुरी
सावंतवाडी ः संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब राष्ट्रीय तहसीलदार मनोज मुसळे, अव्वल कारकून डी. व्ही. मेस्त्री आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्राप्त ४४ अर्जांपैकी ४२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. विधवा निराधार एक अर्ज प्राप्त होता. त्याला मंजुरी देण्यात आली. श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या २२ पैकी २१ अर्जांना मंजुरी देण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या एका प्रस्तावाला मंजुरी दिली. ६८ प्रस्तावांपैकी ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तीन प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.
---
सातार्डा येथे आज नेत्रचिकित्सा
सावंतवाडी ः सातार्डा येथील ग्रामपंचायत कार्यालय व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी बांदा शाखा तसेच ऑप्टिक्स मार्ट, बांदा यांच्या संयुक्त सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयात उद्या (ता. ३१) सकाळी १० वाजता नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. संगणकाद्वारे नेत्रचिकित्सा करण्यात येणार आहे. मोतिबिंदू तपासणी करून माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांनी केले आहे.
------
सावंतवाडीत शुक्रवारी ज्येष्ठांची सभा
सावंतवाडी ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा ३ जून ऐवजी ४ ला ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र सालईवाडा येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासद बंधूभगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
मॉन्सून फेस्टिव्हलचे आंबोलीत आयोजन
आंबोली ः शासनामार्फत २०२३-२४ या वर्षात विविध पर्यटन महोत्सव राबविण्यात येणार आहेत. यात १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत आंबोली येथे मान्सून फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे.