Thur, Sept 21, 2023

पोलिस उपाधीक्षक वाघमारे यांची बदली
पोलिस उपाधीक्षक वाघमारे यांची बदली
Published on : 30 May 2023, 4:02 am
डीवायएसपी वाघमारे यांची बदली
रत्नागिरी, ता. 30 : रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे. त्यांनी त्यांच्या अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण, स्वप्नाली सावंत खून प्रकरणासह अनेक गुन्ह्यांमध्ये चांगली कामगिरी केली.
शासनाच्या गृहा विभागाने आज राज्यातील पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांची नंदुरबार बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती झाली आहे. हे अजून समजलेले नाही.