
निबंध स्पर्धेतील विजेती शुभांगीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
06114
ओरोस ः निबंध स्पर्धेतील विजेती शुभांगी लोहार हिला गौरविताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.
निबंध स्पर्धेतील विजेती शुभांगीचा
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी लोहार हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले. शुभांगी हिने सावंतवाडी शाखेच्या वसतिगृहातर्फे स्पर्धेत भाग घेतला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते हस्ते परेड मैदान, ओरोस येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सूरज शुक्ला, डॉ. प्रगती शेटकर, डॉ. शरावती शेट्टी व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
---
06115
बांदा ः विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ताब्यात घेतलेला डंपर. (छायाचित्र ः धनश्री मराठे)
वाळूच्या डंपरवर बांद्यात कारवाई
मळेवाड ः बांदा चेक पोस्ट येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर आजगाव मंडल अधिकारी विनायक कोदे यांनी ताब्यात घेत कारवाई केली. उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रीतम पोवार, पोलिस कर्मचारी गोसावी, मुणगेकर, होमगार्ड सावंत आदी उपस्थित होते. डंपर जप्त करून सावंतवाडी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.