महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील
महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

sakal_logo
By

06074
निगुडे ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

लक्ष्मण निगुडकर; निगुडेत अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

बांदा, ता. ३१ ः नारीशक्तीचा सन्मान हाच देशाभिमान होय. शासनाने एक चांगला उपक्रम राबवून या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना योग्य तो सन्मान देण्याचे काम केले आहे. निगुडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले. यापुढेही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी केले.
निगुडे ग्रामपंचायतीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सरपंच निगुडकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी गावांमध्ये १५ जणांनी अर्ज केले होते. त्यातील दोघांचे अर्ज विचारात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुभदा गावडे व सविता गावडे या ज्येष्ठ महिलांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरपंच निगुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निगुडे जिल्हा परिषद शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक विजय नेमळेकर व सहशिक्षक शांताराम असनकर, ग्रामसेविका तन्वी गवस यांची बदली झाली. यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच गौतम जाधव, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच समीर गावडे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे, सुप्रिया आसवेकर, रवींद्र गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, पोलिसपाटील सुचिता मयेकर, अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाट, महिला वर्गातून ममता गावडे, शुभदा गावडे, कविता गावडे, रमेश निगुडकर, तलाठी भाग्यश्री शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी लवू जाधव, डाटा ऑपरेटर परेश गावडे, नळ कामगार मधुकर जाधव आदी उपस्थित होते. माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सूत्रसंचालन केले.