
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या नव कार्यकारिणीचा सत्कार
06075
सावंतवाडी ः सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करताना दयानंद गवस, प्रकाश तेंडोलकर आदी.
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या
नव कार्यकारिणीचा सत्कार
सावंतवाडीत सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
बांदा, ता. ३१ ः सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीचा सत्कार सोहळा नुकताच झाला. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा सल्लागार दयानंद गवस, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी तसेच समाजातील मान्यवर व्यक्तींनी व हितचिंतकांनी अभिनंदन केले.
सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची २०२३-२०२४ वर्षासाठी पुनर्रचना करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी सुनील राऊळ, सचिवपदी बाबली गवंडे, तर खजिनदारपदी सिद्धार्थ पराडकर यांची निवड केली. उपाध्यक्षपदी महेश रेमुळकर आणि साक्षी कारिवडेकर यांची, तर कार्याध्यक्षपदी दीपक तारी, सहसचिवपदी नारायण नाईक, सहखजिनदारपदी मधुकर उर्फ योगेश सावंत एकमताने निवड झाली. प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची सभा झाली. संदीप चांदेकर (सावंतवाडी), रवींद्र तावडे (कलंबिस्त), सागर नाणोसकर (नाणोस), मिनल सावंत (सावंतवाडी), मायकल डिसोजा (आंबोली), नीलेश मोरजकर (बांदा), बोमा उर्फ पप्पी कवठणकर (सातार्डा-कवठणी), नेल्सन मिनेझीस (सावंतवाडी), शिवम बोंद्रे (आरोस) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. तालुका सल्लागारपदी सुधीर पराडकर आणि आनंद वेंगुर्लेकर यांची फेरनिवड करण्यात आली.