रायपाटण-गांगणवाडीची पुरापासून होणार सुटका

रायपाटण-गांगणवाडीची पुरापासून होणार सुटका

rat31p6.jpg ः
06098
राजापूरः गाळ उपशाचे सुरू असलेले काम.
------------
रायपाटण-गांगणवाडीची
पुरापासून होणार सुटका
अर्जुनामधील गाळ उपसा ; जिल्हा नियोजनमधील निधीतून काम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ः तालुक्यातील रायपाटण गांगणवाडी परिसरामध्ये अर्जुना नदीपात्रातील साचलेल्या गाळाचा उपसा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नदीपात्रातील बहुतांश गाळ उपसा झाला असून नदीपात्राने काहीसा मोकळा श्‍वास घेतला आहे. या उपशामुळे गांगणवाडीमध्ये भरणार्‍या पुराच्या पाण्याचा धोका कमी होऊन गांगणवाडी परिसराची पुरापासून सुटका होणार आहे. दरम्यान, उपशासाठी आपण शासनासह पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश येऊन निधी उपलब्ध होत गाळ उपशाचे काम सुरू असल्याची माहिती भाजपचे नेते संतोष गांगण यांनी दिली.
दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमध्ये अर्जुना नदीला महापूर येऊन शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामध्ये रायपाटण येथील गांगणवाडीचाही समावेश होता. या पूरस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकांच्या घरामध्ये अचानक घुसलेल्या पाण्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. या नंतर सातत्याने नदीपात्रातील गाळाचा उपसा व्हावा अशी मागणी लोकांकडून केली जात होती.
तसेच ग्रामस्थांकडून शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू होते. गाळ उपशाचे अंदाजपत्रकही जिल्हा नियोजन विभागाकडे संबंधित विभागाकडून सादर करण्यात आले होते. मात्र, त्याला निधीची तरतूद झालेली नव्हती. त्यामुळे निधी उपलब्ध व्हावा म्हणून पालकमंत्री सामंत यांच्या जिल्हाधिकारी यांची भाजप जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांच्या माध्यमातून भेट घेऊन त्यांच्याकडे गाळ उपशाचा प्रश्‍न सविस्तरपणे आपण मांडला होता. त्याची दखल घेऊन त्यांनी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला असून, त्या माध्यमातून गाळ उपशाचे काम सुरू असल्याची माहिती गांगण यांनी सांगताना सामंत आणि सहकार्य करणार्‍या सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. बृहन्मुंबई महानगर पालिका माजी अधिकारी भास्कर गांगण यांचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या वेगाने गाळ उपशाचे काम सुरू असून, नदीपात्राने काहीसा मोकळा श्‍वास घेतला आहे.

चौकट
डोंगराळ भागाचा घ्यावा लागतो आसरा
अर्जुना नदीच्या तिरावर रायपाटण गांगणवाडी वसलेली असून, एका बाजूला अर्जुना नदी तर दुसऱ्या बाजूने येणारा वहाळ अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्या वाडीतील ग्रामस्थांना दुहेरी पुराचा फटका सहन करावा लागतो. अशावेळी मागील बाजूला असलेल्या डोंगराळ भागाचा ग्रामस्थांना आधार घ्यावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com