गोवळकोट मैदानाचे काम जैसे थे

गोवळकोट मैदानाचे काम जैसे थे

ratchl३१४.jpg
०६१०२
चिपळूणः शहरातील पवनतलाव मैदान येथे सुरू असलेले कंपाउंड वॉलचे काम.
ratchl३१५.jpg
M०६१०३
गोवळकोट मैदानावर धूळखात पडलेले साहित्य.
---------------
गोवळकोट मैदानाचे काम जैसे थे
एप्रिलमध्ये झाला होता भूमिपूजन सोहळा; पवन तलावाचे काम वेगाने
चिपळूण, ता. ३१ः शहरासह तालुक्यातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार शेखर निकम यांनी अथक प्रयत्न करून गोवळकोट व पवन तलाव मैदान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. एप्रिल महिन्यात या दोन्ही मैदानांचा भूमिपूजन सोहळाही थाटात पार पडला. यानंतर तत्काळ पवन तलाव मैदानाचे काम सुरू झाले; मात्र दोन महिने व्हायला आले तरी गोवळकोट मैदानाचा एक दगडही हललेला नाही. संबंधित ठेकेदाराने केवळ या ठिकाणी काही साहित्य आणून ठेवले आहे; पण कामाचा पत्ताच नसल्याने नागरिकांसह खेळाडूंकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठोक निधीअंतर्गत पवन तलाव मैदान व गोवळकोट मैदान विकसित करण्यासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर केला होता. यामध्ये १ कोटी ५८ लाख रुपये पवन तलाव मैदान तर १ कोटी ९२ लाख रुपये गोवळकोट मैदानावर खर्च केला जाणार आहे. या दोन्ही मैदानांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार शेखर निकम, लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन यांच्या उपस्थितीत १० एप्रिलला पार पडला. त्यानंतर काही दिवसांतच पवन तलाव मैदानाच्या कामाला गटार बांधणी कामापासून सुरवात करण्यात आली आहे. त्यानंतर या गटाराचे काम मार्गी लावून मैदानाला कंपाउंड वॉलचे काम हाती घेण्यात आले. हे काम सध्या ४० टक्के पूर्ण झाले आहे. पवन तलावाच्या कामाने एका बाजूला गती घेतली असली तरी गोवळकोट मैदानाच्या कामाला मात्र अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. येथील काम अजूनही वेटिंगवरच आहे. सद्यःस्थितीत या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने केवळ काही साहित्य आणून ठेवले आहे. काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल. त्यामुळे हे काम पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी या कामाचे घोडे अद्याप का अडले आहे? याचे कोडे मात्र नागरिकांना उलगडलेले नाही.

कोट
पवन तलाव मैदानासोबत गोवळकोट मैदानातील कामांचे भूमिपूजन झाले. येथे दोन महिने झाले तरी कामाचा पत्ता नाही. येथील खेळाडूंसाठी हे चांगले मैदान आहे. ठेकेदाराने कामाला तत्काळ सुरवात करून ते वेळेत मार्गी लावावे, अन्यथा खेळाडूंचा रोष वाढतच जाईल, याची खबरदारी बाळगावी.
- सतीश शिंदे, खजिनदार, जयहिंद क्रीडा मंडळ गोवळकोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com